Janmashtami Rangoli Designs: श्रावण महिन्यात येणारा गोकुळाष्टमी सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. यादिवशी अनेक भाविक उपवास करतात आणि रात्री १२ नंतर कृष्ण जन्म सोहळा साजरा करून उपवास सोडतात. त्यामुळे यंदाची गोकुळाष्टमी आणखीनच खास करण्यासाठी अंगणामध्ये सुंदर सुंदर डिझाईनची रांगोळी काढू शकता. यामुळे अंगणाची शोभा वाढेल. चला तर पाहुयात गोकुळाष्टमीनिमित्त सुंदर रांगोळी डिझाइन्स. (फोटो सौजन्य – pinterest)
जन्माष्टमीला अंगणासमोर काढा ‘या’ आकर्षक डिझाईनच्या रांगोळ्या; पाहता क्षणी डिझाईनने जिंकेल मन

श्रीकृष्णाला जन्माष्टमीला अंगणात दहीहंडी, कृष्णाची रांगोळी, मोराचे पीस, बासरी अशा वेगवेगळ्या डिझाईनची रांगोळी काढू शकता. यामुळे अंगणाची शोभा वाढेल.

वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळीचा वापर करून या डिझाईनचे कृष्णाचे रूप घराच्या अंगणात काढल्यास रांगोळी पाहून सगळेच तुमचे कौतुक करतील.

सोशल मीडियावर श्रीकृष्णाचे सुंदर सुंदर फोटो उपलब्ध आहेत. बाळ श्रीकृष्ण, बासुरी, मोराचे पीस इत्यादी छोट्या छोट्या गोष्टी रांगोळीमध्ये काढू शकता.

बाजारामध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे छापे सुद्धा उपलब्ध आहेत. छाप्यांमध्ये रंगीत किंवा पांढऱ्या रंगाची रांगोळी टाकून सुंदर डिझाईन काढू शकता.

रांगोळीमध्ये मोराचे पीस किंवा पिसाच्या आकारातील सुंदर रेडीमेड रांगोळी सुद्धा ठेवू शकता.






