व्हिडिओ पॅलेस (Video Palace) प्रस्तुत ‘कन्याकुमारी’ (Kanyakumari) हे गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. या सोलो अल्बमसाठी वैशाली सामंत (VaishaliSamant) हिने स्वरसाज दिला आहे. अभिनेत्री दिशा परदेशी (Disha Pardeshi) आणि अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. ‘कन्याकुमारी’च्या लग्नातील धमाल-मस्ती सोबतच नववधूच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ तसेच लग्नाचा माहोल, पाहुण्यांची लगबग या गाण्यातून छानपणे व्यक्त करण्यात आली आहे. मंदार चोळकर व मिताली जोशी यांनी लिहिलेल्या या गीताला वैशाली सामंत हिने आपल्या मधुर स्वरांनी चारचाँद लावले असून चिनार-महेश यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर हिचे नृत्यदिग्दर्शन या गाण्याला लाभले असून अमोल गोळेच्या छायांकनाने हे गाणं सजलं आहे.