करिना कपूर आणि फॅशन स्टाईल हे उत्तम समीकरण आहे. नुकतेच दुबईतील एका कार्यक्रमासाठी तिने केलेला लुक व्हायरल होतोय. अनामिका खन्नाने डिझाईन केलेला आणि रिहा कपूरने स्टाईल केलेला हा ड्रेस करिनावर कमालीचा आकर्षक दिसतोय
पिंक ब्लश फिगर फिटेड ऑफशोल्डर ड्रेस करिनाने घातला असून त्यासह क्लास आणि ग्रेस दाखवणारे कलरफुल असे गोल्डन एम्ब्रोयडेड फ्लोरल असे जमिनीपर्यंत घोळ असणारे असे जॅकेट तिने स्वतःभोवती लपेटले आहे आणि ज्यात ती एखाद्या रॉयल राजकुमारीसारखी दिसतेय
या पिंक ब्लश ड्रेससह करिनाने हेअरस्टाईल करताना जास्त त्रास घेतलेला नाही. तिने स्टायलिश बन अर्थात अंबाडा बांधत यावर स्टाईल केली आहे आणि ती अत्यंत सुंदर आणि रॉयल दिसत आहे
करिनाच्या या लुकवर सेलिब्रिटीही फिदा झाले आहेत, तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या लुकचे आणि सौंदर्याचे भरभरून कौतुक केल्याचे दिसून येत आहे आणि करिनाने नेहमीप्रमाणे फॅशनमध्ये सर्वांचे मन जिंकले आहे
करिनाने गळ्यात Bvlgari कट वर्क डायमंड्सचा नेकलेस घातला असून यासह मॅचिंग असणारे कानातले घातले आहेत आणि या क्लासी हिऱ्यांच्या दागिन्यांनी तिच्या सौंदर्यात भर घातली असल्याचे दिसून येत आहे
या पिंक ब्लश ड्रेससह करिनाने पिंक ह्यू स्मोकी आईज, डार्क आयब्रो, शिमरी बॉडी, हायलायटर, काजळ आणि ओठांवर ग्लॉसी पिंक लिपस्टिकचा वापर करून आपल्या स्टाईलमध्ये भर टाकली आहे आणि सौंदर्याला चारचाँद लावले आहेत