अभिनेत्री करीना कपूरने फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2024 मध्ये सब्यसाचीने डिझाइन केलेली सिल्व्हर शिमर साडी स्टाईल केली आणि या साडीमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत होती
करिनाने या सिल्व्हर शिमर साडीमध्ये प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि तिचा लूक खूपच बोल्ड आणि मनमोहक दिसत होता. या साडीसह तिने ग्रे रंगाचा सॅटीन बॅकलेस ब्लाऊज घातला होता आणि हे कॉम्बिनेशन कमालीचे आकर्षक दिसतेय
अभिनेत्रीच्या साडीवर खूपच बारीक आणि कलाकुसरीचे असे सुंदर चांदीचे काम होते आणि करिना साडी अत्यंत क्लासीरित्या कॅरी केली होती. करिनाकडे पाहिल्यानंतर तिच्यावरून कोणाचाही नजर हटली नाही इतकी सुंदर दिसत होती
रिच फॅब्रिक, स्लीव्हलेस डिटेल्स आणि पट्ट्या असलेल्या स्कूप्ड नेकलाइनसह अभिनेत्रीने बॅकलेस ब्लाउजसह साडीची कॅरी केली होती. या साडीसोबत अभिनेत्रीने साधे दागिने घातले होते. हिऱ्याचे कानातले आणि अंगठ्यांसह तिने हा लुक पूर्ण केलाय
तिने या साडीसह कोणतीही जास्त लक्ष वेधून घेणारी हेअरस्टाईल न करता अगदी साधी अंबाड्याची स्टाईल कॅरी केली आणि तिचा हा लुक परफेक्ट दिसून येतोय. करिनाने आपल्या स्टाईलने सर्वांनाच वेड लावल्याचं दिसून आलं
न्यूड लिपस्टिक, स्लीक बन आणि सॉफ्ट ग्लॅम मेकअपसह करिनाने आपला लुक अधिक स्टायलिश केला आहे. तिने फाऊंडेशनसह हायलायटर, काजळ, आयलायनर आणि मस्काऱ्याचाही यावेळी वापर केल्याचे दिसून आले
या सगळ्या स्टायलिश आणि शिमरी लुकसह करिनाने कपाळावर छानशी लहान टिकली लावत आपला लुक पूर्ण केला आणि सर्वांचं मन जिंकून घेतल्याचं दिसून आलं. वयाची 40 उलटूनही करिनाने पुरस्कार सोहळ्यात आपल्या लुकने आग लावली आहे