“रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ओपनिंग नाईट” अशा कॅप्शनसह करीना कपूरने फोटो शेअर केले. या ड्रेसमध्ये ती एखाद्या परीप्रमाणे सुंदर आणि आकर्षक दिसत असून तिच्या सौंदर्यावर सर्वांची नजर खिळून राहिली आहे
क्लीन ऑफशोल्ड असणाऱ्या या तिच्या मखमली जांभळ्या ड्रेसची स्टाईल पाहून अनेक जण फिदा झालेत. तिच्या या ड्रेसच्या नेकलाइनला गुलाबी-जांभळ्या फुलांनी सजवले असून तिचा लुक अत्यंत ग्लॅमरस दिसतोय
एखाद्या ब्रिटीश राजकुमारीसारखा हा लुक करत करिनाने त्यात रंगाचा जाळीदार बुरखा संपूर्ण चेहऱ्यावर परिधान केलाय आणि तिचा हा लुक कमालीचा क्लासी आणि रॉयल वाटत आहे. तिच्या चेहऱ्यावरील नजरच हटत नाहीये
या ड्रेससह तिने मिनिमल दागिने घातले असून कानात हिऱ्याचे कानातले परिधान केले आहेत. जे स्टाईल स्टेटमेंटला अत्यंत क्लासी लुक मिळवून देत आहेत आणि करिनाच्या अदांनी त्यावर चारचाँद लावले असल्याचे दिसून येत आहे
करिनाने या ड्रेससह मॅच होईल असा ग्लॅमरस ग्लॉसी मेकअप केलाय. फाऊंडेशन, ग्लॉसी हायलायटर, त्यासह शिमरी आयशॅडो, काजळ, मस्कारा, आयलॅशेस, आयलायनर आणि ग्लॉसी लिपस्टिक लावत तिने हा लुक पूर्ण केलाय
दरम्यान तिचा हा क्लासी लुक अनिल कपूरची मुलगी रिहा कपूरने स्टाईल केल्याचे दिसून येत आहे. रिहाने आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचे लुक स्टाईल केले असून नेहमीच तिचा रॉयल टच दिसून येतो आणि करिनाने हा लुक अत्यंत उत्तमरित्या कॅरी केलाय