स्वातंत्र्यदिन आणि 'या' प्रेरणादायी गाण्यांचे आहे अतूट नाते
संदेश आते है - बॉर्डर चित्रपटातील हे गाणे अनेकांच्या मनावर राज्य करतेय. हे गाणे एकून मन अगदी भावूक होऊन जाते. बॉर्डवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना हे गाणे समर्पित आहे
ऐ मेरे वतन के लोगों- लता दिदींच्या आवाजाची जादू अशी होती की, 'ऐ मेरे वतन के लोगों' ऐकून लोक अगदी मंत्रमुग्ध होऊन जातात. हे गाणे देशासाठी प्राण गमावलेल्या लोकांना समर्पित करण्यात आले आहे
देश मेरे-मेरी जान है तू- द लिजेंड ऑफ भगत सिंग हा भगत सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपटातील हे गाणे आहे. या गाण्याने देशासाठी शहीद झालेल्या भगत सिंग याच्या स्मरणार्थ आहे
ये जो देश है तेरा- स्वदेश चित्रपटातील 'ये जो देश है तेरा' हे गाणे एआर रहमानने गायले आहे. हे गाणे ऐकून प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होते
है प्रीत जहाँ की रीत सदा- हे सदाबहार गाणे मनोज भारत का रेहनेवाला हू चित्रपटातील आहे. हे गाणे आजही लोकांच्या मनावर राज्य करते
तू भुला जीसे- अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट चित्रपटातील हे गाणे खूप गाजले. या गाण्यातही देशभक्तीची भावना पाहायला मिळेल
चक दे इंडिया- शाहरुख खानच्या चक दे इंडिया चित्रपटातील हे गाणे लोकांचे खूप आवडते आहे. क्रिकेटच्या सामन्यादरम्यान हे गाणे स्टेडियममध्ये वाजताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल
तेरी मिट्टी- केसरी चित्रपटातील हे गाणे अवेकांच्या आवडीचे आहे. हे गाणे ऐकून सगळेच भावूक होतात. या गाण्यात देशावरील प्रेम दाखवण्यात आले आहे
ए वतन- आलिया भट्टच्या 'राझी' चित्रपटातील हे गाणे देशावरील प्रेम दाखवते. हे गाणे अनेकांच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. हे गाणे ऐकून तुमच्यात नक्कीच देशभक्तीची भावना जागृत होईल