अवकाशात एक अद्भुत घटना तुम्हाला पाहायला मिळणार असून रोज तुम्ही ज्या चंद्राला पाहता त्याचं एक अनोखे रूप तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चंद्राचं वेगळं रूप म्हणजे नेमकं काय पाहायला मिळणार आहे ते पाहूयात
चंद्राला आपण लाडाने चांदोमामा, चांदोबा म्हणतो. या चांदोबाचे तुम्हाला एक अद्भूत असे स्वरूप पाहायला मिळणार आहे
काही दिवसांनी चांदोबाचे एक विशिष्ट रूप पाहायला मिळणार असून साधा चंद्र नाही तर सुपरमून दिसणार आहे
या वर्षी आपल्याला एक नाही तर चार सुपरमून पाहायला मिळतील. 19 ऑगस्टला वर्षातील पहिले सुपरमून दिसणार आहे. नंतर 18 सप्टेंबर, 17 ऑक्टोबर आणि 15 नोव्हेंबर या दिवशी सुपरमून दिसेल
यासाठी तुम्हाला दुर्बीणची गरज नाही. कारण सुपरमून म्हणजे चंद्र त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा असतो. त्याचा प्रकाशही लख्ख असतो
चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना त्याच्या परिभ्रमणाची कक्षा पृथ्वीच्या सर्वांत जवळ असते त्यावेळी पौर्णिमा येते, तेव्हा सुपरमून आकाराने मोठा पूर्ण दिसतो