YouTube वर सबस्क्रायबर्सची कमाल! कोणत्या क्रिएटर्सना मिळतं सिल्व्हर, गोल्डन आणि डायमंड प्ले बटण? (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
YouTube क्रिएटर्सना सबस्क्रायबर्सच्या संख्येवर आधारित सिल्व्हर, गोल्डन आणि डायमंड प्ले बटणे पाठवते.
खरं तर प्ले बटणची सर्व कमाल केवळ सबस्क्रायबर्स करतात, असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.
YouTube क्रिएटरच्या चॅनेलवर 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर सिल्व्हर प्ले बटण दिलं जातं.
एखाद्या YouTube क्रिएटरच्या चॅनेलवर 10 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यास, त्याला गोल्डन प्ले बटण दिलं जातं.
YouTube डायमंड प्ले बटण 1 कोटी सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर क्रिएटरला दिलं जातं. हे फार कमी लोकांना मिळते.
याशिवाय, एक विशेष कस्टम डायमंड प्ले बटण देखील आहे, जे YouTube 5 कोटी सबस्क्राइबर्स पूर्ण झाल्यानंतर दिलं जातं.
ज्या YouTube क्रिएटरच्या चॅनेलवर 10 कोटी सबस्क्रायबर्स पूर्ण होतील त्याला रेड डायमंड प्ले बटण दिलं जातं.