पृथ्वीचा तो कोपरा जिथे पोहचणं जणू अशक्यचं! मानव दूर पण स्पेस स्टेशन आहे इथून जवळ...
पॉइंट निमो हे दक्षिण महासागरात स्थित आहे. समुद्रात वसलेला हा भाग चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे.
याजवळ कोणतेही बेट किंवा जमिनीचा कोणताही तुकडा नाही. समुद्राच्या मध्यभागी हा बिंदू बनवण्यात आला आहे.
मनोरंजक गोष्ट म्हणजे याच्या सर्वात जवळचे शेजारी अंतराळ स्थानकात राहणारे अंतराळवीर आहेत, कारण पृथ्वीवरील सर्वात जवळची जमीन मानवी वस्तीपासून हजारो किलोमीटर दूर आहे
पॉइंट निमो हे अंतराळातून खाली पडणाऱ्या जुन्या आणि निरुपयोगी उपग्रहांसाठी एक स्मशानभूमी म्हणून काम करते, म्हणजेच निरुपयोगी उपग्रह आणि अंतराळ स्थानके या ठिकाणी टाकली जातात
९९२ मध्ये क्रोएशियन-कॅनेडियन अभियंता ह्रवोजे लुकाटेला यांनी या जागेची ओळख पटवली. त्यांनी संगणक प्रोग्रॅमच्या मदतीने हे ठिकाण शोधले. हा बिंदू महासागराच्या एकदम मध्यभागी आहे