लग्नसमारंभात करा रॉयल एंट्री! लग्नात केलेले 'हे' लुक वेधून घेतली साऱ्यांचे लक्ष
कांजीवरम सिल्क साडी सौंदर्यात कायमच भर पडते. डार्क रंगाची कांजीवरम साडी नेसल्यानंतर त्यावर टेम्पल किंवा मोत्याचे दागिने परिधान करावेत. यामुळे तुमचा लुक उठावदार दिसतो.
लाल रंग कोणत्याही त्वचेच्या रंगावर अतिशय सुंदर दिसतो. त्यामुळे लाल रंगाची बनारसी किंवा इतर कोणती साडी नेसल्यास त्यावर कुंदन किंवा हिऱ्यांचे दागिने परिधान करावेत.
ऑफ व्हाईट किंवा सोनेरी रंगाची साडी नेसल्यानंतर त्यावर सोन्याचे दागिने घालावेत. गोल्डन रंगाच्या कांजीवरम सिल्क साडीवर सोन्याचे दागिने सुंदर दिसतात.
लग्न सोहळ्यांमध्ये काहींना खूप हेवी साडी नेसायला आवडत नाही. साधी आणि हलकी साडी नेसल्यानंतर गळ्याभोवती भरगच्च दागिने घालावेत.
कायमच लग्नात डिझायनर साडी नेसण्याऐवजी लग्न सोहळ्यांमध्ये बनारसी साडी नेसावी. कोणत्याही रंगाच्या बनारसी साडीमध्ये तुमचा लुक रॉयल दिसतो.