ऑटोमोबाईल क्षेत्रात कार, दुचाकी, बस याशिवायही बरीच वाहने येतात, जी आकाराने अगदी अवाढव्य आणि मोठी असतात. बरोबरच त्यांची कामेही तशीच अवजड आणि जोखमीची असतात. खाणकाम उद्योग हे तसं अवघड उद्योगक्षेत्र आहे, मोठमोठे डोंगर फोडणे, मातीचे खडकांचे ढिगारे वाहून नेणे, खडकाळ आणि दुर्गम भागात काम करणे अशी कित्येक जोखमी कामे खाणकाम उद्योगात केली जातात. खाणकाम उद्योगासाठी काम करणारी अशीच काही अवजड वाहने आज आपण पाहणार आहोत.

ड्रिल रिग-ड्रिल रिग हे मशीन आणि वाहन, स्फोटकांसाठी खोल छिद्रे पाडण्याचे काम करते. खाणीत उत्खनन सुरू करण्यापूर्वी ड्रिलिंग करणे आवश्यक असते.

बुलडोझर-जमीन समतल करणे, रस्ते तयार करणे आणि मोठे खडक हटवणे यासाठी हे बुलडोझर वापरले जाते. जगातील सर्वात मोठ्या बुलडोझर्सपैकी काही भारतीय खाणींमध्येही वापरले जातात.

व्हील लोडर- खोदलेले खनिज, धातू, खडी, कच्चा माल डंप ट्रकमध्ये भरण्यासाठी आणि खाण क्षेत्रात साहित्य हलवण्यासाठी या व्हील लोडरचा वापर केला जातो.

हायड्रॉलिक एक्स्कॅव्हेटर-खडक आणि माती खोदण्यासाठी वापरले जाणारे हे हायड्रॉलिक एक्स्कॅव्हेटर खाण उद्योगातील सर्वात महत्त्वाचे यंत्र आहे. यापैकी काही मॉडेल्सचे वजन 100 ते 800 टनांपर्यंतही असते.

डंप ट्रक -खाणींमधून निघणारा खडक, कोळसा, लोखंड धातू किंवा इतर खनिज पदार्थ वाहून नेण्यासाठी अशा डंप ट्रकचा वापर केलं जातो. या डंप ट्रकची वाहन क्षमता ५० ते ४०० टनांपर्यंत असू शकते.






