शाहिरांच्या शायरीत सजणारे सौंदर्य काय? तर ते 'हे'; मिताली मयेकरची मनमोहक अदा (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री मिताली मयेकरने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या @mitalimayekar या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये शृंगार करून जणू स्वर्गातून अप्सराच अवतरली असल्याचा भास या छायाचित्रांतून होत आहे. मराठी सौंदर्य कसे असते? याचे उत्तम उदाहरण मिताली मयेकरचा हा लुक आहे.
'कानात झुमके, नाकात नथ आणि केसांमध्ये माळलेली फुले' पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. तिच्या चेहऱ्यावरील हास्य या छायाचित्रांमधील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.
मितालीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Fussclass Pune premier.🌼' असा कॅप्शन दिला आहे. तसेच या संपूर्ण लुक आणि photoshoot बद्दल माहिती दिली आहे.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी गर्दी केली आहे. 'सौंदर्य असावे तर असे...' म्हणत काही चाहत्यांनी तिच्या निखळ सौंदर्यची प्रशंसा केली आहे.