nat and katherine marriage
नॅट (नताली) स्किवर आणि कॅथरीन ब्रंट ही क्रिकेट जगतातील पहिली समलिंगी जोडी नाही. यापूर्वीही न्यूझीलंडच्या एमी सॅटरथवेट आणि ली ताहुहू, तसेच दक्षिण आफ्रिकेच्या मारिजने कप आणि डेन व्हॅन निकेर्क यांनी लग्न केली आहेत.
नॅट आणि कॅथरीन या दोघीही इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा महत्त्वाचा भाग आहेत. ऑक्टोबर २०१९ मध्ये या दोघींचा साखरपुडा झाला होता.
आयसीसी महिला विश्वचषक २०२२ मध्ये कॅथरीन ब्रंट आणि नॅट सायव्हर इंग्लंड संघाचा भाग होत्या. गतविजेता असल्याने स्पर्धेच्या सुरुवातीला सलग तीन सामने गमावल्याने इंग्लंडला मोठा धक्का बसला. अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी सलग विजयांसह त्यांनी झटपट पुनरागमन केले.