दुर्गा पूजनाला बंगाली लुक करायचा आहे? मग साडी नेसताना फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
बंगाली साडी विकत घेताना पांढऱ्या किंवा लाल रंगाच्या साडीची निवड करावी. साडीवरील लुक आणखीनच सुंदर दिसण्यासाठी साडीच्या काठाला मॅच होईल असा ब्लाऊज निवडावा.
साडी नेसताना सर्वप्रथम साडी कंबरेवर खोचून घ्या. त्यानंतर साडीचा पदर कायमच डाव्या बाजूला काढावा. यामुळे साडीवरील लुक आणखीनच सुंदर दिसतो.
साडीचे दुसरे मागून समोर आणून कंबरेवर एक एक करून प्लेट्स काढून घ्या. साडीच्या रुंदीनुसार प्लेट्स काढून नाभीच्या खाली खोचा. ज्यामुळे लुक सुंदर दिसेल.
बंगाली साडीचा पदर डाव्या बाजूने काढावा. त्यानंतर पुढच्या बाजूला पदर सैल सोडावा. या पद्धतीने नेसलेली साडी अतिशय चापून चोपून बसेल.
बंगाली लुक करताना हातांना आणि पायाला आल्ता लावावा, जेणेकरून तुमच्या सौंदर्यात वाढ होईल.