रात्र झालीच नाही तर...! जगातील एकमेव असा देश जिथे 76 रात्र होतंच नाही; 24 तास चमकत असतो सूर्य
युरोप खंडात वसलेला नाॅर्वे हा देश उत्तर ध्रुवाजवळ आहे, ज्यामुळे इथे भरपूर थंडी असते. या देशाची खासियत म्हणजे, इथे ६३ दिवस सूर्य मावळत नाही. संपूर्ण अडीच महिन्यात इथे फक्त ४० मिनिटे रात्र असते
येथे १२:४० वाजता सूर्यास्त होतो. सुमारे ४० मिनिटांनंतर, पहाटे १:३० वाजता सूर्य पुन्हा उगवतो. म्हणूनच हे ठिकाण लॅँड ऑफ मिडनाईट सनच्या नावाने ओळखले जाते
नाॅर्वेमध्ये द मिडनाईट सन (The Midnight Sun) फेस्टिव्हल आयोजित केले जाते, ज्यात लोक मध्यरात्री बीचवर फिरायला जातात. इथला मध्यरात्रीचा सूर्य पाहण्यासाठी लोक दूरदूरवरुन येथे येत असतात
इथे मे ते जुलै या काळात सूर्य ४० मिनिटांसाठी मावळतो. हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी जगभरातून लोक नाॅर्वेमध्ये येत असतात. तुम्ही इथे बोटींग, मासेमारी आणि ट्रेकींगचा आनंद लुटू शकता
येथील नाॅर्दन लाइट्स (Northern Lights) एक अद्भूत अनुभव आहे, जो पाहण्यासाठी लोक येथील नॉर्वेजियन ट्रोम्सो शहरात येतात. या लाइटंसना बोरियालिस असेही म्हटले जाते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ या लाइट्स पाहण्याचा सर्वाेत्तम वेळ आहे. याकाळात नाॅर्वेमध्ये रात्र फार लांब असते