‘फोन भूत’चा ट्रेलर पाहून कतरिनाच्या चाहत्यांना बसला धक्का
कतरिना कैफ (Katrina Kaif), सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि ईशान खट्टर (Ishan Khattar) अभिनीत 'फोन भूत'च्या पहिल्या पोस्टरपासूनच प्रेक्षक चित्रपटाची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दर्शकांची उत्सुकता लक्षात घेऊन निर्मात्यांनी 'फोन भूत' चित्रपटाचा ट्रेलर (Phonebhoot Trailer Launch) आज प्रदर्शित केला. भूल भुलैया 2 नंतर प्रेक्षकांना 'फोन भूत' हा हॉरर कॉमेडीपट पाहायला मिळणार असून प्रेक्षकांनी या मनोरंजक आणि मजेदार शैलीवर प्रचंड प्रेम दाखवले आहे. गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ लिखित, 'फोन भूत' हा चित्रपट रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित आहे.