phonebhoot movie team
कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान अभिनीत ‘फोन भूत’च्या पहिल्या पोस्टरपासूनच प्रेक्षक चित्रपटाची झलक पाहण्यासाठी उत्सुक होते. आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. कारण या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर जुहूमध्ये ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी उपस्थित होते.
कतरिनाने या कार्यक्रमासाठी फ्लॉवर पॅटर्नची प्रिंट असलेला ड्रेस घातला होता. तर सिद्धांत आणि ईशान हे काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप छान दिसत होते.
फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीच्या एक्सेल एंटरटेनमेंटतर्फे निर्मित या चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफही झळकणार आहेत.