श्रेया घोषालने तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर शेअर केले फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
रसिकांच्या मनावर आपल्या सुमधुर आवाजाने राज्य करणाऱ्या श्रेया घोषालने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक छानशी पोस्ट केली आहे. आपल्या आवाजाने अनेकांच्या हृदयावर राज्य करणारी गायक श्रेया घोषाल या पेहरावात फार सुंदर दिसत आहे.
सध्या श्रेया इंडियन आयडॉलमध्ये परीक्षक म्हणून कार्यरत आहे. तिच्यासह गायक व गीतकार विशाल दादलानी आणि रॅपर बादशाह परीक्षक आहेत.
शेअर केलेल्या फोटोजमध्ये श्रेयाने काळया रंगाचा पेहरावा केला आहे. कानामध्ये झुमके आणि हातामध्ये अंगठी आणि बांगड्या तिच्या सौंदर्याला आणखीन तेज देत आहेत.
पोस्टखाली कॅप्शनमध्ये तिने काळ्या रंगाच्या साडीचे कौतुक केले आहे. तिचे म्हणणे आहे की, काळ्या रंगाच्या साडीचे आकर्षण कधीही कमी होत नाही.
कॉमेंट्समध्ये श्रेयाच्या या लूकला अनेक जणांनी प्रतिसाद दिला आहे. तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. एका नेतकर्याने श्रेयाची चक्क नजर काढली आहे.