‘रनवे 34’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज, वाढली प्रेक्षकांची उत्सुकता
अजय देवगण (Ajay Devgan) निर्मित आणि दिग्दर्शित ‘रनवे 34’ (Runway 34) रिलीजसाठी पूर्णपणे तयार आहे. हा चित्रपट २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच निर्मात्यांनी चित्रपटाचा दुसरा ट्रेलर (Runway 34 Second Trailer) रिलीज केला आहे. पहिल्या ट्रेलरमधल्या दृश्यांमुळे लोक मंत्रमुग्ध झाले होते. तसेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अजय देवगण (Ajay Devgan) यात दिसले होते. दुसऱ्या ट्रेलरमध्ये पायलटच्या भावनांचे चित्रण करण्यात आले आहे.