चिली (1960): ग्रेट चिली किंवा वाल्डिव्हिया भूकंप ९.५ रिश्टर तीव्रतेचा जगातील सर्वात प्रबळ भूकंप चिलीमध्ये झाला. या आपत्तीत १,६५५ लोकांचा मृत्यू झाला, तर २० लाखांहून अधिक लोक बेघर झाले.
अलास्का, अमेरिका (1964): ग्रेट अलास्का किंवा गुड फ्रायडे भूकंप-९.२ रिश्टर तीव्रतेच्या या भूकंपात १३० लोकांचा मृत्यू झाला आणि अंदाजे २.३ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.
सुमात्रा, इंडोनेशिया (2004): ९.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे दक्षिण आशिया व पूर्व आफ्रिकेत प्रचंड हानी झाली. हजारो लोकांचा बळी गेला.
जपान (2011): ग्रेट तोहोकूमध्ये झालेल्या ९.१ तीव्रतेचा भूकंप आणि भीषण त्सुनामीने १५,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर १.३ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले.
कामचटका, रशिया (1952): या ९.० तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात त्सुनामी आली, परंतु मृत्यूची संख्या तुलनेत कमी होती.
इक्वेडोर-कोलंबिया सीमारेखा (1906) : ८.८ तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामी आली आणि सुमारे १,५०० लोकांचा जीव गेला.
चिली (2010): पुन्हा एकदा चिलीमध्ये ८.८ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. यात ३.७ लाखांहून अधिक लोक बेघर झाले.
अलास्का, अमेरिका (1965) : ८.७ तीव्रतेचा भूकंप आणि ३५ फूट उंचीच्या त्सुनामी लाटा उसळल्या. मात्र लोकवस्ती कमी असल्याने तुलनेने कमी हानी झाली.
भारत (1950): अरुणाचल प्रदेशात ८.६ तीव्रतेचा भूकंप झाला. हा भारतातील सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जातो
इंडोनेशिया (2012): ८.६ तीव्रतेचा भूकंप सुमात्राजवळ झाला. २००४ नंतर येथील हा सर्वात तीव्र भूकंप होता.