सहावारी ते नऊवारीमध्ये अधिक आकर्षक दिसेल कमनीय बांधा, आजच खरेदी करा 'या' डिझाईनचा कंबरपट्टा
पूर्वीच्या काळी सर्वच महिला चांदीचा कंबरपट्टा वापरत होत्या. याशिवाय मोत्यांचे, कुंदन, फुलांचे, सोनेरी रंगाचे कंबरपट्टे बाजारात उपलब्ध आहेत. कंबरेभोवती चांदीचा कंबरपट्टा अतिशय सुंदर दिसेल. यामुळे तुमचा लुक आकर्षक दिसेल.
वेस्टननं साडी किंवा ड्रेस परिधान केल्यानंतर या डिझाईनचे कंबरपट्टा अतिशय सुंदर दिसतील. नाजूक नाजूक मणी आणि रंगीत लेसचा वापर करून बनवलेले कंबरपट्टे बाजारात सहज उपलब्ध होतात.
लग्न सराईच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर टेम्पल दागिने घातले जातात. त्यामुळे साडीवरील लुक आणखीनच सुंदर दिसण्यासाठी टेम्पल कंबरपट्टा वापरू शकता.
हल्ली सर्वच महिला, मुली कंबर आणखीनच उठावदार दिसण्यासाठी अँकेलट वेस्ट कंबरपट्टा वापरतात. अँकेलट वेस्ट कंबरपट्टा कोणत्याही कॉटन साडीवर किंवा डिझायनर साडीवर उठून दिसतो.
अनेकांना मोत्याचे दागिने घालायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे कोणत्याही सिल्क साडीवर तुम्ही या डिझाईनचा मोती कंबरपट्टा परिधान करू शकता.