खोलवर समुद्रात मानवाला खूप आश्चर्यजनक गोष्टी सापडल्या आहेत. काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित असाव्यात असा दावा केला जात आहे.
योनागुनी स्मारक हे जपानमधील योनागुनी बेटाजवळ 1980 च्या दशकाच्या मध्यात सापडलेल्या पाण्याखालील खडकाची रचना आहेत. काही लोकांचं अस मत आहे कि, हे एक प्राचीन शहर असेल. तर काहीजण असा तर्क लावतायत की, ते नैसर्गिकरित्या तयार झाले आहे.
जपानी शब्द ma no umi म्हणजेच 'डेविल्स सी' याचा अर्थ जगभरातील धोकादायक सागरी ठिकाणांचे वर्णन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आहे. याचा अर्थ असा की अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांना जपानी मा नो उमी म्हणतात.
समुद्राच्या तळाशी क्रॉप सर्कल सापडले आहेत. सात फूट व्यासाची नमुनेदार वर्तुळे जी दक्षिण जपानच्या किनाऱ्यावर 1995 मध्ये प्रथम दिसली होती.
बाल्टिक समुद्रातील विसंगती हे पीटर लिंडबर्ग, डेनिस अबर्ग आणि त्यांच्या स्वीडिश ओशनएक्स डायव्हिंग टीमने जून 2011 मध्ये बोथनिया आखाताच्या मध्यभागी उत्तर बाल्टिक समुद्राच्या तळावर खजिन्याची शिकार करताना घेतेले फोटो आहेत त्यात दिसून येत आहेत.
मारियाना ट्रेंच हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल ज्ञात बिंदू जो 36,000 फूट (सुमारे 11,000 मीटर) पाण्याखाली आहे.