न्यायाचे देवता शनिदेव महाराज कुंभ राशीत मार्गी झाले आहेत. 15 नोव्हेंबर रोजी शनिने थेट वळण घेतले असून शनि प्रत्यक्ष असल्यामुळे अनेक राशींवर त्याचा प्रभाव दिसून येतो. यावेळी कोणत्या राशीवर त्याचा प्रभाव राहणार आहे जाणून घेऊया
कर्क राशीच्या लोकांना शनिची प्रत्यक्ष ग्रहस्थिती असताना प्रत्येक पावलावर सावध राहावे लागेल. कर्क राशीच्या लोकांनी या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शनिचा आरोग्यावर अधिक प्रभाव राहील असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात येत आहे
सिंह राशीच्या लोकांना आपले नाते जपावे लागेल अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. तुमचे पैसे सुरक्षित ठेवा, अनावश्यक खर्चापासून दूर राहा, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तसंच आपल्या रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुम्हाला बऱ्याच गोष्टी गमवाव्या लागतील
शनीच्या प्रत्यक्ष हालचालीचा प्रभाव कन्या राशीच्या लोकांवर दिसू शकतो. कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती शनिच्या मार्गी होण्यामुळे प्रभावित होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
मीन राशीच्या लोकांसाठी सध्या शनीची साडे सती चालू आहे. शनि प्रत्यक्ष असल्यामुळे मीन राशीच्या लोकांना करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. कोणतेही काम सावधगिरीने करा आणि अजिबात गाफील राहून मीन राशीच्या व्यक्तींना चालणार नाही
वरील सर्व राशींना शनिच्या मार्गी होण्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही