श्रावणात अनेक शिवभक्त भोलेनाथांवरील भक्तीपोटी शिवध्यान करतात. धर्मशास्त्रानुसार, शिवध्यान केल्यास पापांचा नाश होतो आणि आत्मा मोक्षाच्या मार्गावर जातो असं म्हटलं जातं.
वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिलं तर शिवध्यान आरोग्यासाठी फायदेशीर आहे. फक्त श्रावणातच नाही तर इतर दिवशी देखील शिवध्यान करणं फायदेशीर आहे.
जीव आणि शिव हे एक आहे. जीव म्हणजे शरीर आणि आत्मा म्हणजे शिव हे एकमेकांवर अलंबून आहेत.
मन शांत असेल तर शरीर निरोगी राहतं आणि शरीरा आजारी असेल तर याचा परिणाम मनावर होतो.
आजकाल अनेक जण मानसिक नैराश्याने त्रासलेले असतात शिवध्यानामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. दररोज शिवध्यान केल्यास श्वसानाशी संबंधित आजारही दूर होतात.
डोक्यातील अतिविचार दूर होतात आणि कोणत्याही प्रकारचं दडपण येत नाही. शिवध्यान करताना ताठ बसा आणि पोटातून दिर्घश्वास घ्या.