अभिनेत्री श्रुती मराठेने तिच्या सोशल मीडियावर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. या छायाचित्रांमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्री श्रुती मराठेने या पोस्टमध्ये साडी लुक केला आहे. तिचा हा लुक खरंच कातिलाना आहे. तिचे हसणे पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'नृत्यात लावण्य,नसानसात महाराष्ट्र!"' असे नमूद केले आहे. तिचा हा मराठी स्वॅग मराठी तरुणांना फार भावला आहे.
केसात गजरा, माथ्यावर चंद्रकोर आणि गळ्यात हार असा पेहराव तिने केला आहे. हातात बांगड्या तिच्या निखळ सौंदर्याला शोभा देत आहेत.
कमेंट्समध्ये तरुणांनी मनभरून आणि भरभरून कमेंट्स केले आहेत. स्वर्गाची अप्सराही फिकी अशी श्रुती मराठे!