Sobhita Dhulipala's Pelli Kuturu Ceremony Photos
सध्या टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाच्या लग्नाची जोरदार होताना पाहायला मिळत आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर त्यांच्या लग्नाची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शोभिताने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर 'पेली कुथुरू' या विधी दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. या विधीसाठी अभिनेत्रीने रेड कलरची बनारसी साडी नेसलेली दिसत आहे. लूकला साजेसे सिंपल दागिने वेअर करून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये सोभिताने बिंदी, नेकलेस, कानातले झुमके, बाजुबंद आणि बांगड्या असा श्रृंगार करत आपल्या सौंदर्याची शोभा वाढवली आहे. या विधी दरम्यान अभिनेत्रीला हळदही लावण्यात आली होती. विधी दरम्यान घरातल्या महिलांकडून तिचे औक्षणही करण्यात आले.
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांचा हा विवाह सोहळा तेलुगू पद्धतीने मोठ्या शाही स्वरूपात पार पडणार आहे. त्यासाठी हैदराबादमध्ये जोरदार तयारीही सुरू आहे.
येत्या ४ नोव्हेंबरला हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये त्यांचा हा विवाहसोहळा पार पडणार असून जोडप्याच्या लग्नाची तयारी आता सुरू झाली आहे.