हयग्रीव अवतार आणि मस्त्यवतार! कथा (फोटो सौजन्य - Social Media)
वेद चोरणाऱ्या दानवाला हयग्रीव रूपातच मारले जाईल असे वरदान प्राप्त होते. त्यामुळे त्याला ठार करण्यासाठी आणि पृथ्वीवरचा अंधाकार मिटवण्यासाठी श्रीविष्णूंना ह्य्ग्रीव अवतार घ्यावा लागला.
एकदा एका तलावात राजा सत्यव्रत स्नान करत असताना त्याच्या हातात एक दिव्य तेजस्वी मासळी लागते. ती मासळी त्याला म्हणते की या तलावातल्या मोठ्या मासळ्या मला मारून टाकतील मला वाचव राजन.
राजा सत्य व्रत दयाळू मनाचा. तो तिला राजवाड्यात आणून एका जळपात्रात ठेवतो. दुसरा दिवशी पाहतो तर काय? ती मासळी त्या जलपात्राच्या आकाराची झालेली असते.
मग राजन त्या मासळीला जवळपास असलेल्या एका मोठ्या जळाशयात सोडतो. पाहता पाहता ती मासळी त्या जलाशयाचा आकार घेते. राजन विचार करतो की या मासळीला या जलाशयात ठेवणेही उचित नाही.
त्या मासळीला समुद्रात सोडले जाते. ती मासळी आणखीन मोठा आकार घेऊ लागते आणि शेवटी त्यातून श्रीविष्णू प्रकट होतात. ते म्हणतात राजन हो मीच विष्णू! तुझ्यावर फार मोठी जबाबदारी सोपावत आहे. येत्या सात दिवसात पृथ्वी तळाचा विनाश होणार आहे. महाप्रलय येणार आहे. तू सप्तऋषी आणि पृथ्वीवरील जनजीवन एका बोटीमध्ये सवार हो! या प्रलयातून वाचवण्यासाठी मी स्वतः येईल. त्या दानवाच्या वधा नंतर संपूर्ण पृथ्वी जलमय झाली आणि सृष्टीच्या रक्षणाकरिता मत्स्या अवतार अवतरीत झाले आणि नव्या युगाला प्रारंभ झाला.