स्वाभिमान, सन्मान आणि स्वातंत्र्याची कहाणी, ‘ताली’ वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज
अभिनेत्री सुश्मिता सेनच्या ‘ताली’(Taali) वेबसीरिजचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता या वेबसीरीजचा ट्रेलर (Taali Trailer) रिलीज झालाय.‘ताली’ ही वेबसीरिज तृतीय पंथीयांसाठी झटणाऱ्या, त्यांच्या हक्कांसाठी उभ्या राहणाऱ्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गौरी सावंत यांच्या भूमिकेत दिसणार आहे. गौरीच्या स्वाभिमान, सन्मान आणि स्वातंत्र्याची कहाणी यात मांडण्यात आली आहे. ही वेबसीरिज 15 ऑगस्टला जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे.