Vice President C.P. Radhakrishnan swearing-in ceremony at Raj Bhavan
सी पी राधाकृष्णन हे देशाचे 15 वे उपराष्ट्रपती बनले आहेत. राधाकृष्णन हे 152 मतांनी विजय झाले. यानंतर आज (दि.12) त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे.
राष्ट्रपती भवन येथे सी पी राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपती पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या.
राष्ट्रपती भवनात सकाळी १० वाजता शपथविधी समारंभ पार पडला, जिथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सी पी राधाकृष्णन यांनी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च संवैधानिक पद स्वीकारले.
उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी प्रमुख राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह केंद्र सरकारचे अनेक वरिष्ठ मंत्री शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते.
सी पी राधाकृष्णन यांच्या राजभवनातील शपथविधी सोहळ्यासाठी विविध राज्यांतील नेते आणि राज्यपालही दिल्लीत पोहोचले होते. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक गुलाब चंद कटारिया, झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव उपस्थित आहेत.
सी पी राधाकृष्णन हे दक्षिण भारताचे नेतृत्व करतात. शपथविधी सोहळ्यासाठी ते लुंगी घालून दक्षिणात्य संस्कृती दाखवून देत होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना आणि आता शपथविधी सोहळ्यासाठी सी पी राधाकृष्णन हे लूंगी लूकमध्ये दिसून आले.