जगातील 'हा' देश आहे सर्वाधिक चॉकलेट प्रेमी; एका वर्षात खातात 'इतके' चॉकलेट
जगातील अनेक देशांमध्ये विविध प्रकारचे चॉकलेट बनवले जातात
जगभरात चॉकलेट प्रेमींची कमतरता अजिबात नाही. यामुळे दरवर्षी लाखो किलोमध्ये चॉकलेटचे उत्पादन केले जाते
खास चवींचे चॉकलेट वेगवेगळ्या देशांमध्ये बनवले जातात आणि निर्यात केले जातात
चॉकलेटशिवाय कोणताही दिवस साजरा केला जात नाही. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, तसेच कोणत्याही गोष्टीचे सेलिब्रेशन चॉकलेटने नक्की होते
पण तुम्हाला माहिती आहे का जगातील एक असा देश जो चॉकलेट्सचे सर्वाधिक उत्पादनही करतो आणि सर्वात जास्त चॉकलेट खाणारा देश देखील आहे
तर स्वित्झर्लंड हा देश जगातील सर्वाधिक चॉकलेट खाणारा देश आहे
स्वित्झर्लंडंमधील प्रत्येक व्यक्ती दरवर्षी सरासरी 10 किलो चॉकलेटचे सेवन करतो