रोजच्या धावपळीच्या आयुष्यात ट्राफिकच्या गोंगाटापासून आणि तणावातून काही निवांच क्षण मिळाने असं प्रत्येकाला वाटतं. विकेंडला अनेक जण मुंबई पुण्याजवळ असलेल्या ठिकाणांना भेट देतात.
सोशल मीडियामुळे मुंबई पुणे नाशिक आणि रायगडमधली अनेक ठिकाणी पर्यटकांनी गर्दी असते.
काश्मीरला फिरायला जाण्याचं स्वप्नं प्रत्येकाचं असतं. काही वेळेस आर्थिक स्थिती तर काही वेळेस वेळेचं नियोजन करता येत नाही. अशा वेळेस प्लॅनिंग राहून जातं.
जर तुम्हाला ही कमी खर्चात आणि कमी वेळेत काश्मीर सारख्या निसर्गाचा आनंद घ्यायटा असेल तर साताऱ्याला फिरण्याचा प्लॅन तुम्ही करु शकता.
भुरळ पाडणारी वनराई, गार वारा आणि आकाशाला कवेत घेणारा सह्याद्रीचं विलोभनीय सौंदर्याचा अनुभव देणारं, निसर्गाने नटलेलं ठिकाण म्हणजे तापोळा.
सातऱ्यातील तापोळा गावावर निसर्गाची भरभरुन कृपा दृष्टी आहे. या गावाला महाराष्ट्राचं मिनी काश्मीर देखील म्हणतात.
तापोळा महाबळेश्वरपासून काही अंतरावरच आहे. या ठिकाणी बोटींगची सुविधा देखील प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
तुम्हाला ट्रेकींगची आवड असेल तर तापोळ्यापासून जवळच असलेल्या वासोटा किल्ल्याला देखील तुम्ही भेट देऊ शकता.