अभिनेत्रीने शेअर केली बिग बॉसची आठवण. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने तिच्या @jahnavikillekar या इंस्टाग्राम हँडलवर बिग बॉसच्या आठवणी शेअर केल्या आहेत. या फोटोंमध्ये तिचा अंतिम फेरीतील आऊटफिट दिसून येत आहे.
जान्हवी तिच्या डॅशिंग अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. तसेच तिने बिग बॉसच्या या पर्वातून दाखवून दिले आहे कि ती एक बिनधास्त मुलगी आहे.
बिग बॉस पर्व ५ वेच्या प्रेक्षकांनी जान्हवीच्या या बिनधास्त वागणुकीचे कौतुक केले आहे. तसेच सुरुवातीच्या काळात तिला किलर गर्ल म्हणून उपमा देण्यात आली होती.
बिग बॉसच्या या आठवणी पाहून नेटकरी आणि तिच्या चाहत्यांनी कॉमेंट्समध्ये प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी बिग बॉसची आठवण येत असल्याचे सांगितले आहे.
अनेक चाहत्यांना जान्हवीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा असल्याचे काही वातावरण कॉमेंट्समधून दिसून येत आहे. हातामध्ये नेम प्लेट आणि बिग बॉसचा बेड मॉडेल घेऊन अभिनेत्रीने फोटोज शेअर केले आहेत.