जगातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी! तब्बल 8 वर्षे अडकली लोक, संपूर्ण जग हादरलं
इतिहासातील सर्वात जास्त काळ चालणारी ही वाहतूक कोंडी कोणत्या रस्त्यावर नाही तर पाण्यावर झाली होती. ही वाहतूक कोंडी इजिप्तच्या सुएझ कालव्यावर घडून आली. सांगण्यात येते की, या ठप्पमुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था डगमगली होती. व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते.
1967 मध्ये हा ट्राफिक जॅम झाला होता, जो 8 वर्षांनी म्हणजेच 1975 मध्ये उघडला. या ठप्प होण्यामागचं कारण जहाज तुटणं किंवा वाकड्या वाटेमुळे अडकणं हे नव्हते तर दोन्ही बाजूंनी होणारा भडिमार होता
वास्तविक सुएझ कालवा हा इजिप्तचा भाग आहे. त्याची उत्तर-पूर्व सीमा इस्रायलला जोडलेली आहे. सुएझ कालव्यानंतरचा बराचसा काळ इस्रायलची नजर सिनाई द्वीपकल्पावर होती. याच जागेसाठी इस्रायलने 1967 मध्ये इजिप्तवर अचानक हल्ला केला
हे युद्ध 6 दिवस चालले आणि इस्रायलने सिनाई आपल्या ताब्यात घेतले. ज्या दिवशी हा हल्ला झाला, त्या दिवशी 15 मालवाहू जहाजे भूमध्य समुद्रातून सुएझ कालव्याद्वारे लाल समुद्राकडे जात होती. त्याला 12 तास लागले असते, परंतु इस्रायलच्या हल्ल्यामुळे आणि सिनाईवर कब्जा केल्यामुळे ती जहाजे सुएझ कालव्यात अडकली
या हल्ल्यांनंतर इजिप्तने सुएझ कालवा दोन्ही बाजूंनी बंद केला. मुख्य व्यापारी मार्ग बंद करण्यासाठी कालव्यात स्फोटके टाकण्यात आली. ज्यामुळे मध्यभागी असलेली जहाज तिथेच अडकून राहिली आणि 12 तासांचा प्रवास 8 वर्षांमध्ये बदलला
1973 मध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले. इजिप्तने इस्रायलवर हल्ला करून सिनाई काबीज केली. युद्धाच्या समाप्तीनंतर, सुएझ कालवा पुन्हा खुला करण्यात आला, परंतु कालव्यात टाकलेल्या स्फोटकांमुळे जहाजे बाहेर काढण्यासाठी सुमारे 2 वर्षं लागली आणि शेवटी 1978 मध्ये, फक्त 14 जहाजं तिथून जाऊ शकली
या कोंडीमुळे अनेक देशांना करोडोंचं नुकसान सहन करावं लागलं. या वाहतूक कोंडीचा उल्लेख Stranded in the Six-Day War नावाच्या पुस्तकात करण्यात आला आहे