जगातील एकमेव पुस्तक जे वाचण्यात मोठमोठे विद्वानही झाले फेल; 600 वर्षांपासून न उलगडलेलं रहस्य
या पुस्तकाचे नाव आहे 'वॉयनिक मॅनुस्क्रिप्ट'. हे पुस्तक अनेक कोड्यांनी भरलेले असल्याचे म्हटले जाते, कारण त्याच्या पानांवर मानवांचे आणि विचित्र वनस्पतींचे असंख्य फोटो आहेत.
वॉयनिक मॅनुस्क्रिप्टविषयी थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्यात अशा काही झाडांची आणि वनस्पतींची चित्रे वापरण्यात आली आहेत ज्यांचा पृथ्वीवरील वनस्पतींशी संबंध नाही.
वृत्तानुसार, हे पुस्तक १९१२ मध्ये विल्फ्रेड वॉयनिच नावाच्या एका पुस्तक विक्रेत्याने खरेदी केले होते. त्यानेच या पुस्तकाला वॉयनिक मॅनुस्क्रिप्ट असे ठेवले.
असे म्हटले जाते की जेव्हा हे पुस्तक लिहिण्यात आले तेव्हा यात बरीच पाने होती पण कालांतराने खराब होऊन आता यात फक्त २४० शिल्लक आहेत.
हे पुस्तक कुणी लिहिले हे आजही कुणाला ठाऊक नाही. काहीजण हे पुस्तक एलियन्सने लिहिल्याचा दावा करतात. हे पुस्तक येल विद्यापीठाच्या बेनेके दुर्मिळ पुस्तक ग्रंथालयात जतन केले आहे.