हा कर्करोग ठरतो मृत्याला कारणीभूत. (फोटो सौजन्य - Social Media)
२०२० मध्ये कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग प्रमुख ठरला आहे. यामुळे जवळपास 1.8 मिलियन मृत्यू झाले. याचा उच्च मृत्युदर मुख्यतः धूम्रपानामुळे आहे. त्यामुळे धूम्रपानाच्या सेवनात घट होणे गरजेचे आहे.
2020 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोलोरेक्टल कर्करोग आहे, ज्यामुळे 916,000 मृत्यू झाले आहेत. हा कर्करोग मुख्यतः पचनसंस्थेवर परिणाम करतो.
अग्नाशयाचा कर्करोग हा एक आक्रमक प्रकारचा कर्करोग असून, सुरुवातीच्या अवस्थेतच मृत्यू होण्याचा धोका असतो.
2020 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर ब्रेस्ट कँसर आहे. या कर्करोगामुळे झालेल्या मृत्यूची नोंद 685,000 अशी आहे.
2020 मध्ये यकृताच्या कर्करोगामुळे 830,000 मृत्यूंची नोंद झाली. यकृतावर घाट करणारा हा कर्करोग फार भयंकर असतो.