या दिवाळीत फुटणार मनोरंजनाचा सुटली बॉम्ब. (फोटो सौजन्य - Social Media)
भारतीय सैन्य अधिकारी मेजर मुकुंद वरदराजन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'अमरन' ३१ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शिवकार्तिकेयन, साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत.
एम. राजेश दिग्दर्शित सिनेमा 'ब्रदर' एका भावाची कथा सांगतो. ही कथा अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना फार वाट पाहावी लागणार नाही आहे. ३१ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे.
कविन, रेडिन किंग्सले, पृथ्वी राज आणि सुनील सुखदासारख्या कलाकारांची कलाकृती असणारा 'ब्लडी बेगर' सिनेमा एका भिखारी माणसाची कथा सांगतो. सिनेमा ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केला जाईल.
'भूल भुलैया ३' ने आताच सोशल मीडियावर प्रेक्षक आकर्षित केले आहेत. या चित्रपटातील विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांचे नृत्य फार पाहिले जात आहे. चित्रपट १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.
दोन भागांच्या यशानंतर सिंघम तिसऱ्या भागाने तसेच नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रोहित शेट्टीचा मास्टरपीस 'सिंघम अगेन' १ नोव्हेंबर २०२४ रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे.