जास्त प्रोटीन मिळवण्याच्या नादात हे नॉनव्हेज फूड्स जास्त खाऊ नका (फोटो सौजन्य: iStock)
चिकन ब्रेस्ट स्नायूंच्या विकासासाठी आणि दुरुस्तीसाठी खूप चांगले मानले जाते. परंतु जास्त चिकन खाल्ल्याने किडनीवर परिणाम होऊ शकतो विशेषत: ज्यांचे लिव्हर आधीच कमकुवत आहेत.
अंडींमध्ये प्रोटीनसह व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स देखील असतात. एका मोठ्या अंडीत सुमारे 6-7 ग्रॅम प्रोटीन असते. पण जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
लाल मांस हे आपल्याला जास्तकरून मटणमध्ये आढळते. 100 ग्रॅम मटणामध्ये सुमारे 25-30 ग्रॅम प्रोटीन असते. परंतु यत भरपूर सॅच्युरेटेड फॅट देखील असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
100 ग्रॅम सॅल्मनमध्ये 20-25 ग्रॅम प्रोटीन असतात. मोठ्या प्रमाणात सॅल्मन फिशचे सेवन केल्याने शरीरातील नर्व्हस सिस्टीमवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
कोळंबीमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते परंतु त्याचे अतिसेवनकेल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो.