मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर 'या' साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन
महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणी साडीने सगळ्यांचं भुरळ घातली आहे. हल्लीच्या तरुण पिढीला सुद्धा सणावारांच्या दिवसांमध्ये पैठणी साडी नेसायला खूप जास्त आवडते.
सोशल मीडियावर माहेश्वरी साडीचा मोठा ट्रेंड वाढला आहे. बारीक काठ आणि साडीच्या आतील नक्षीकामामुळे पुन्हा एकदा नव्याने साडीने मोठी मागणी वाढली आहे.
सणासुदीच्या दिवसांमध्ये काहींना खूप हेवी काठपदर साड्या नको असतात. अशावेळी इरकल साडीची निवड करू शकता. हातमागावर विणलेली इरकल साडी नेसल्यानंतर सुद्धा लुक देते.
अभिनेत्री जेनेलियाने नेसलेल्या खणाच्या साडीला सगळीकडे मोठी मागणी आहे. ही साडी कोणत्याही सण समारंभासाठी अतिशय उत्तम आहे.
दक्षिण भारतात फेमस असलेली कांजीवरम सिल्क साडी लग्न समारंभात आवर्जून नेसली जाते. या साडीचा हेवी आणि रिच लुक कार्यक्रमाची शोभा वाढवतो.