भारतातील ही मंदिर एकदा पहाच(फोटो सौजन्य: Social Media)
सोमनाथ मंदिर (गुजरात): भारतातील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर हिंदू धर्माच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान राखते.
काशी विश्वनाथ मंदिर (वाराणसी, उत्तर प्रदेश): गंगा नदीच्या किनारी स्थित असलेले हे मंदिर भगवान शिव यांच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र आहे.
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग: हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र स्थान आहे. हे मंदिर आंध्र प्रदेश राज्यातील श्रीशैलम येथील श्री मल्लिकार्जुन देवतेचे आहे. मल्लिकार्जुन हे भगवान शिवाचे एक रूप मानले जाते.
गंगासागर मंदिर (पश्चिम बंगाल): गंगा नदीच्या मुहाने असलेले हे स्थान धार्मिक यात्रा आणि स्नानासाठी महत्त्वाचे आहे. इथे गेल्यावर एक वेगळीच शांती अनुभवायला मिळते.
द्वारका येथील श्री कृष्णाचे मंदिर: गुजरातमधील द्वारका येथे कोटी हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री कृष्णाचे मंदिर आहे. रोज लाखो भाविक द्वारकेत येत असतात. समुद्रकिनारी हे मंदिर असल्यामुळे याच्या सौंदर्यात अधिकच भर पडते.