व्हेज म्हणून खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे NonVeg, नाव ऐकून धक्का बसेल
व्हेज खाद्यपदार्थांमध्ये ही भाजी फार लोकप्रिय आहे मात्र दाव्यानुसार, ही भाजी व्हेज नसून नॉनव्हेज आहे. या भाजीचे नाव आहे मशरूम
मशरुम हा भाजीचा प्रकार नॉनव्हेज बऱ्याचदा टक्कर देतो, ज्यामुळे अनेकांना हा पदार्थ खायला फार आवडतो. मात्र याचे सत्य समजल्यावर तुम्हाला धक्काच बसेल
मशरूममध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, नियासिन, फोलेट, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक असे अनेक पोषक घटक आढळतात. मशरूम शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे
मशरूम ही वनस्पती नसून एक खाद्य बुरशी आहे. ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तर मशरूम हे व्हेज किंवा नॉनव्हेज नसून केवळ एक बुरशी असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे
मशरूम हे प्राणी किंवा नॉनव्हेज सारखे दिसत नाही, तसेच यात मांस देखील नसते. ज्यामुळे याला नॉनव्हेज पदार्थात मोडले जाऊ शकत नाही
त्याचप्रमाणे यात झाडांप्रमाणे पानं, मुळं किंवा बिया नसतात, याला सूर्यप्रकाशाचीही गरज भासत नाही ज्यामुळे हे व्हेज देखील मानले जाऊ शकत नाही