'अथांग' वेबसिरीजचा थरारक टीझर आऊट... 'प्लॅनेट मराठी ओटीटी' यावेळी घेऊन येतंय वेगळ्या विषयावरची वेगळ्या आशयाची वेबसीरिज 'अथांग'. या वेबसीरीजची निर्मिती हरहुन्नरी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं केलीय तर, अथांगचं दिग्दर्शन जयंत पवार यांनी केलं आहे. 'अथांग'मध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चोक, रसिका वखारकर आणि धैर्य घोलप या कलाकारांची फौज झळकणार आहे.