2025 मध्ये हॉरर-कॉमेडी चित्रपट घालणार धुमाकूळ; जाणून घ्या कोणता चित्रपट कधी होणार प्रदर्शित (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
गेल्या वर्षी, हॉरर-कॉमेडी चित्रपटांनी थिएटरमध्ये खूप चर्चा केली. आता या वर्षीही या शैलीतील चित्रपट थिएटरमध्ये धमाल करण्यासाठी सज्ज आहेत. या वर्षी कोणते चित्रपट तुमचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.
थामा - स्त्री 2 च्या यशानंतर, दिनेश विजन मॅडॉक हॉरर कॉमेडी विश्वात आणखी एक चित्रपट घेऊन येत आहे. आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना हॉरर कॉमेडी चित्रपट 'थामा'मध्ये दिसणार आहेत. यंदाच्या दिवाळीत हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
शक्ती शालिनी - मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्स यावर्षी 'शक्ती शालिनी' चित्रपट घेऊन येत आहे. हा चित्रपट 31 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. मात्र, त्याच्या स्टारकास्टची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
राजा साब - साऊथचा सुपरस्टार प्रभासही यावर्षी एक हॉरर कॉमेडी चित्रपट घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. चित्रपटातून प्रभासचे अनेक लूक्सही समोर आले आहेत. हा चित्रपट 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
भुत बंगला - या यादीत अक्षय कुमारच्या 'भूत बांगला' चित्रपटाचाही समावेश आहे. अक्षय कुमार पुन्हा एकदा एका हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले आहे.