‘कन्नी’ने साजरा केला व्हॅलेंटाईन डे.... ऋता दुर्गुळे, शुभंकर, वल्लरी, अजिंक्यने केली धमाल!
मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांचा मागोवा घेणाऱ्या ‘कन्नी’ चित्रपटातील कलाकारांनी आज व्हॅलेंटाईन डे गेट वे ॲाफ इंडिया येथे क्रुझवर साजरा केला. यानिमित्ताने ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर, अजिंक्य राऊत यांच्यासह निर्माते, दिग्दर्शकांनी गाणी, नृत्य करत धमाल केली.