नेकल्सच्या सुंदर डिझाइन्स
इतरांपेक्षा तुम्हाला सुद्धा थोडी युनिक डिझाईन हवी असेल तर तुम्ही या पद्धतीचे चोकर बनवून घेऊ शकता. चोकर गळ्यात खूप सुंदर दिसतात.
पानांचा आकार असलेले चोकर गळ्यात घातल्यानंतर खूप सुंदर दिसते. लग्नात घालण्यासाठी तुम्ही या पद्धतीचे चोकर अगदी उत्तम डिझाईन आहे.
तुम्हाला जर जास्त हेवी नेकलेस परिधान करायला आवडत नसेल तर तुम्ही या डिझाईनचे नाजूक साजूक नेकलेस सोन्यामध्ये बनवून घेऊ शकता.
काठापदराची किंवा पैठणी साडी नेसल्यानंतर या डिझाईनचा नेकलेस गळ्यात उठून दिसेल. गळा भरलेला वाटेल. इतर कोणतेही दागिने घालण्याची आवशक्यता भासणार नाही.
साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये या पद्धतीचे शॉर्ट नेकलेस गळ्यात खूप सुंदर दिसतात. तुम्ही या पद्धतीचा नेकलेस साडीसह ड्रेसवर सुद्धा परिधान करू शकता.