मगर बनते वधू आणि वर करतो तिला किस! या ठिकाणी पार पडतो विचित्र लग्नसोहळा
मेक्सिकोच्या सैन पेड्रो हुआमेलुला शहरात दरवर्षी एक आगळे - वागळे लग्न होते. येथे शहराचा महापौर एका मादी मगरीशी लग्न करतो. मगरीला नवरीसारखं तयार केलं जातं आणि तिला लग्नाचा पारंपारिक सफेद गाऊन दिला जातो.
स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की, या लग्नामुळे चांगली शेती आणि भरपूर प्रमाणात समुद्री खाद्य मिळते.
या विधीच्या माध्यमातून लोक पाऊस, बियाण्यांचे अंकुर आणि समाजाच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागतात.
30 जून 2023 ला सैन पेड्रो हुआमेलुलाचे महापौर ह्यूगो सोसा यांनी कॅमन मगर एलिसिया एड्रियानासोबत लग्न केलं होतं. ही प्रथा 230 वर्षे जुन्या परंपरेचा एक भाग आहे. हे लग्न चोंटल आणि हुआवे समुदायांमधील ऐतिहासिक सलोख्याचे प्रतीक आहे.
लग्नादरम्यान, अॅलिसिया एड्रियानाला प्रथम हिरवा स्कर्ट, ट्यूनिक आणि हेडड्रेस परिधान करण्यात आला होता जो सांस्कृतिक महत्त्व दर्शवितो. नंतर तिला पांढरा गाऊन घालण्यात आला. यावेळी सुरक्षिततेसाठी तिचे तोंड बांधले होते. समारंभाच्या आधी, तिची रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात आली, जिथे लोक तिच्यासोबत गाणी म्हणत आणि नाचत होते.