काय आहेत थायरॉइडची लक्षणे? जाणून घ्या. (फोटो सौजन्य - Social Media)
सतत थकवा जाणवणे आणि काम करण्याची उर्जा कमी होणे हे थायरॉईडच्या असंतुलनाचे प्रमुख लक्षण आहे. यामुळे दिवसभर सुस्ती जाणवू शकते.
थायरॉईड हार्मोनच्या कमी-जास्त प्रमाणामुळे अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे दिसून येते. हे विशेषतः आहार किंवा व्यायामशैलीत बदल न करताही होते.
थायरॉईडच्या अति सक्रियतेमुळे भूक अधिक लागणे, तर कमी सक्रियतेमुळे भूक पूर्णपणे मंदावणे अशी लक्षणे दिसू शकतात.
सतत डोकेदुखी, केसांच्या गळतीत वाढ, किंवा त्वचा कोरडी होणे यामुळे थायरॉईडचा संशय येऊ शकतो.
थायरॉईडमुळे हृदयाचे ठोके अनियमित होणे किंवा हृदय जलद धडधडणे अनुभवले जाऊ शकते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.