What is Hollow Earth Theory? (फोटो सौजन्य - Social Media)
'Hollow Earth Theory' नुसार, पृथ्वी आतून पोकळ आहे आणि तिच्या आतील भागात एक स्वतंत्र जग, हवामान प्रणाली आणि कदाचित प्राचीन किंवा परग्रहावरील जीव सुद्धा अस्तित्वात असू शकतात.
हा सिद्धांत 17व्या शतकात एडमंड हॅलीसारख्या वैज्ञानिकांनी मांडला होता. त्यांनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील गोंधळामुळे हे सुचवलं की पृथ्वीच्या आतील बाजूस अनेक थर असावेत.
काही कल्पनांनुसार, पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवांजवळून आतील जगात जाण्याचे प्रवेशद्वार आहे. काही प्रवाशांनी अशा छिद्रांचे अनुभव सांगितले आहेत, परंतु त्यांना वैज्ञानिक आधार नाही.
असे मानले जाते की, जर आतील बाजूस सृष्टी असेल तर त्याला भूमंडळ ही असण्याची दाट शक्यता आहे. त्या ठिकाणी उजेड देण्यासाठी सूर्यही असेल.
आधुनिक विज्ञानाने या सिद्धांताला फेटाळलं आहे. सिस्मिक (भूकंपीय) अभ्यास, भूगर्भशास्त्र आणि उपग्रह मापनांनुसार पृथ्वीचे अंतर्गत थर घन आहेत आणि ती पोकळ असण्याची शक्यता नाही. पण तरी हा प्रश्न सुटत नाही. कदाचित आपण स्वतः त्या पोकळीचा भाग असू आणि आपल्या वर एक वेगळं आवरण असेल आणि तेथे दुसरी सृष्टी असेल. ईश्वराची आराधना करताना 'उपरवाला' म्हणणे किंवा अवकाशात वरच्या बाजूला पाहणे, या सगळ्या क्रियांवरून 'आपण स्वतः त्या पोकळीचा भाग आहोत का?' असा प्रश्न तयार होतो.