मायरा वायकुळच्या भावाचं नाव आहे 'व्यो..' (फोटो सौजन्य - Social Media)
आपल्या अभिनयाने राज्यभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आणि अगदी लहानश्या वयात फार प्रसिद्धी मिळवणाऱ्या मायराच्या घरी अगदी थोड्याच दिवसांपूर्वी आनंदाची बातमी आली आहे.
आता व्याकुळ कुटुंबामध्ये मायराच्या लाडावर हक्क मागण्यासाठी नवीन पाहुणा आलेला आहे. आता मायरा ताई झाली आहे.
इंस्टाग्रामवर नव्या पाहुण्याचे नाव जाहीर करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मायराच्या लहान भाऊचे नाव काय असणार? हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता, त्याचे उत्तर समोर आले आहे.
नाव जाहीर करण्यात आले आहे. मोठ्या कॅप्शनने नावाला सांगण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये "आमच्या बाळाच नाव काय ? उंच अमर्याद आकाशातील सूर्याचे तेज मी, वाऱ्याच्या सळसळ तृप्तीचा स्पर्श मी, नितळ निर्मळ जल- जीवन मी, अनंत -अथांग असे अवकाश मी, पंचमहाभूतांनी परिपूर्ण असा मी .... कोण? अहं ...." असे नमूद करण्यात आले असून शेवटी बाळाचे नाव ' व्योम ' असल्याचे सांगण्यात आले आहे.
कॉमेंट्समध्ये व्याकुळ कुटुंबियांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच बाळाच्या नावाचे कौतुक करण्यात आले आहे.