भारतात पहिल्यांदा दारू कधी आली? मुघल आणि ब्रिटिशांची यांचा नेमका संबंध काय?
भारतात पहिल्यांदा दारू मुघल किंवा ब्रिटिशांनी आणली नाही. भारतीय संस्कृतीमध्ये मद्याचे फार पूर्वीपासूनचे संदर्भ सापडले आहेत. यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. भारतीय लोक पूर्वीपासूनच मद्याचे सेवन करत होते.
मुघल आणि इंग्रजांच्या काळात मद्यप्राशनाच्या संस्कृतीमध्ये बदल झाला. मुघल सत्ते शाही दरबारामध्ये मद्याला विशेष स्थान आहे. मुघलांच्या काळात सामाजिक स्थिती आणि शाही जीवनशैली वेगळी होती. मुघल शासक अकबरने कधीच मद्यप्राशन केले नाही. पण त्याच्या दरबारात मद्यप्राशन केले जायचे.
जहांगीर हा मुघल सम्राट मद्याचा शौकीन होता. त्याने शासन काळात मद्य व्यापाराला मोठे प्रोत्साहन दिले. तसेच ब्रिटिशांनी मद्याला व्यापाराचे स्वरूप दिले. त्यानंतरच्या काळात मद्यनिर्मिती आणि विक्री हे व्यापाराचे प्रमुख स्वरूप बनले.
इंग्रजांच्या काळात मद्यप्राशन करणे हा फक्त थाट होता. ऋग्वेदात मदिरेच्या वेगवेगळ्या प्रकारात मद्याचा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे.
सतत मद्यपान करणे शरीरासाठी अतिशय घातक मानले जाते. यामुळे आरोग्याचे गंभीर नुकसान होते. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात दारू, बिअर आणि इतर मद्याचे सेवन करावे.