बेगूनकोदार रेल्वेस्थानकावर असणाऱ्या सफेद साडीतील महिला कोण? (फोटो सौजन्य- Social Media)
या स्थानकाची इतकी भीती का? याच्यामागे कारण काय आहे? तर या स्थानकाचा एवढा दरारा तेथे सावट करणाऱ्या भुताचे आहे. असे आम्ही नाही स्थानिक म्हणतात.
स्थानिकांचे म्हणणे आहे की येथे रात्रीच्या सुमारास सफेद साडीत एक महिला दिसून येते. ही साधी-सुधी महिला नसून ती एक प्रेमतात्मा आहे.
या ठिकाणच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यातील एक कथा म्हणजे येथील स्टेशन मास्टरचा अचानक झालेला मृत्यू! या मृत्यूचा संदर्भ त्या सफेद साडीच्या महिला प्रेताशी जोडण्यात आला आहे. त्याने त्या महिलेला पाहिले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
असे म्हणतात की काही वर्षांपूर्वी एका महिलेने या स्थानकावर आत्महत्या केली होती. तिची प्रेतात्मा अजूनही या स्थानकावर भटकते.
अजूनही या स्थानकावरून जेव्हा ट्रेन पास होते, तेव्हा लोकांच्या हृदयाची धडधड वाढते आणि ट्रेनचे दरवाजे खिडक्या बंद होतात. एक भयाण शांतता पसरते.